बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आजपर्यंत अडीचशे पर्यंत होता,रविवारी या आकड्याने तिनशेचा टप्पा पार केला,जिल्ह्यात तब्बल 336 पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .लोकांनी काळजी घेतली नाही तर अवघड परिस्थिती होईल असे चित्र आहे .





बीड जिल्ह्यात1708 लोकांची तपासणी केली असता 336 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये वडवणी 5,शिरूर 1,पाटोदा 15,परळी 15,माजलगाव 23,केज 20,गेवराई 8,धारूर 2,बीड 158,आष्टी 18,अंबाजोगाई 71 पॉझिटिव्ह सापडले आहेत .