बीड – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडी ला पाच जागा एक भाजप,एक क्षीरसागर गट आणि एक स्वतः पापा मोदी असा निकाल लागला .महाविकास आघाडीकडे दोन ठिकाणी उमेदवार नसल्याने तेथे भाजप आणि क्षीरसागर गटाचा फायदा झाला .
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाही पायदळी तुडविल्याचे सांगत भाजप ने या मतदान आणि निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातला होता .
शनिवारी 57 टक्के मतदान झाले होते,रविवारी सकाळपासून मतमोजनिस सुरुवात झाली .यामध्ये भाऊसाहेब नाटकर, कल्याण आखाडे,राजकिशोर मोदी,अमोल आंधळे,सुशीला पवार,कल्पना शेळके,रवींद्र दळवी,सूर्यभान मुंडे हे आठ जण विजयी झाले .