मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब मुळे एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकम्प आला असताना आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्या पात्राची तपासणी केली जाईल आणि त्यांनी ज्या मेल आयडी वरून हे पत्र पाठवले आहे तो त्यांचाच आहे का ? अस म्हणत या पत्रावर त्यांची स्वाक्षरी नसल्याचे सांगत आजतरी सावध भूमिका घेतली आहे .
मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे की , गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते
मुख्यमंत्री कार्यालयाने या पद्धतीने माहिती दिल्याने सरकार देशमुख यांना पाठीशी तर घालत नाहीत अशी चर्चा होऊ लागली आहे .