मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कलेक्शन चे आरोप झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधीपक्षासह आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे .महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना असून तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे .

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर अधिकाऱ्यांना मुंबई मधून महिन्याला शंभर कोटी रुपये कलेक्शन करून देण्याचे आदेश दिले होते .
सिंग यांच्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात एकच भूकम्प झाला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे .आता या प्रकरणात राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे .ठाकरे म्हणतात की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेलं पत्र धक्कादायक आहे,महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना आहे .गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे .