बीड – जिल्ह्यातील 1799 रुग्णांची तपासणी केली असता त्यामध्ये 265 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत .यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे बीड आणि अंबाजोगाई तालुक्यातील आहेत,बीड आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत आहे .नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही .



शनिवारी बीड जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 5,शिरूर 2,पाटोदा 6,परळी 12,माजलगाव 11,केज 8,गेवराई 9,धारूर 5 बीड 108,आष्टी 14 आणि अंबाजोगाई मध्ये 85 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .