April 12, 2021

वाय जनार्दन राव यांना रोटरीचा जागतिक पुरस्कार !

वाय जनार्दन राव यांना रोटरीचा जागतिक पुरस्कार !

बीड – शहरातील हॉटेल अन्विता चे मालक तथा प्रथितयश व्यापारी वाय जनार्दन राव यांना रोटरी इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेचा मानाचा सर्व्हिस आबाऊ सेल्फ हा पुरस्कार जाहीर झाला आहे .देशातील मोजक्या व्यक्तींना हा पूरस्कार मिळतो,जगभरातील काही ठराविक लोकांमधून राव यांची निवड झाल्याने हा बीडच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे .या यशाबद्दल राव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे .

रोटरी इंटरनॅशनल यामार्फत जगाच्या पाठीवर शंभर पेक्षा अधिक देशात सामाजिक कार्य केले जाते .जगातील लाखो लोक रोटरीच्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहेत .या सेवेची दखल म्हणूनरोटरी इंटरनॅशनल दरवर्षी जगभरातील रोटरी क्लब आणि डिस्ट्रिक्ट मधील
अश्या रोटेरियन व्यक्तींची दखल
घेत असते ज्यांनी त्यांचे आयुष्य रोटरीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित गरजू गरीब लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वेळोवेळी मदतीचा हात दिलेला आहेसोबत रोटरीलाही सढळ हाताने मदत केलेली आहेज्याने स्वतःच्या आयुष्यातही रोटरीच्या फोर वे टेस्ट चेअनुपालन केलेआहे अश्या रोटेरियनला
“सर्व्हिस अबव्ह सेल्फ” हा रोटरीचा सर्वोच्च पुरस्कार देऊनत्याच्या कार्याचे कौतुक रोटरी इंटरनॅशनल करते


प्रत्येक रोटेरियनचेहा पुरस्कार मिळणे एक स्वप्न असते जे आज बीड चे वाय जनार्दन राव यांच्या रूपाने साकार झाले आहे.


हा पुरस्कार दरवर्षी रोटरी इंटरनॅशनल कडून जगभरातील शंभर व्यक्तींना देण्यात येतो
आणि त्या शंभर रोटेरियन पैकी फक्त पंधरा रोटेरियन भारतीय असतात
यावर्षी भारतातील पंधरा पुरस्कृत रोटेरियन पैकी एक आपल्या डिस्ट्रिक्ट 3132 मधील
रोटरी क्लब ऑफ बीडचे माजी अधक्ष्य रोटेरियन वाय जनार्धन राव आहेत.

राव यांच्या या निवडीमुळे बीड जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक केले आहे .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *