November 27, 2021

बीड जिल्ह्यात लसीचा तुटवडा !नागरिकांना मारावे लागत आहेत खेटे !

बीड जिल्ह्यात लसीचा तुटवडा !नागरिकांना मारावे लागत आहेत खेटे !

बीड – देशातील 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि काही आजार असलेल्या तसेच 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींना कोरोना वरील लस देण्याच्या मोहिमेत बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी खंड पडला आहे .जिल्ह्यातील बीड जिल्हा रुग्णालयासह काही ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना रुग्णालयात खेटे मारावे लागत आहेत .

गेल्या वर्षभरापासून जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी भारताने सर्वप्रथम लस उपलब्ध केली .सिरम आणि भारत बायोटेक ची लस 16 जानेवारी फ्रंट लाईन वर्कर ला देण्यास सुरुवात केली .त्यानंतर गेल्या महिनाभरापासून सर्वसामान्य नागरिक जे 45 वर्षेपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि त्यांना काही आजार आहेत अशा तसेच 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली .

बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालय आणि सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध करून दिली आहे,त्याचसोबत परळी,बीड माजलगाव येथील काही रुग्णलायत देखील लस उपलब्ध करून देण्यात आली आहे .

जिल्ह्यात 68 सरकारी केंद्र आणि 10 खाजगी केंद्र याठिकाणी गेल्या काही दिवसात तब्बल 61 हजार लोकांना लस देण्यात आली आहे,यातील जवळपास 58 हजार लोकांनी सरकारी केंद्रावर लस घेतली आहे .जिल्ह्याला आतापर्यंत लसीचे 74 हजार डोस उपलब्ध झाले आहेत .

मात्र गुरुवारी दुपारपासून जिल्हा रुग्णालयात, माजलगाव आणि गेवराई च्या उपजिल्हा रुग्णालयात तसेच काही खाजगी रुग्णालयात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे .बीड जिल्ह्याला लातूर येथून लसीचा पुरवठा होतो,मात्र तो वेळेत न झाल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावर येऊन पुन्हा परत जावे लागत आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *