बीड – मागच्या वर्षी सुरू झालेला कोरोनाचा कहर आजही सुरूच असून गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यात तब्बल 21 हजार पेक्षा अधिक लोकांना बाधा झाली त्यातील 19 हजारपेक्षा जास्त लोक कोरोना मुक्त झाले आहेत .आजमितीस जिल्ह्यात 1722 कोरोना बाधित रुग्ण आहेत .

मागच्या वर्षी 22 मार्च ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु जाहीर केला होता त्यानंतर 24 मार्च पासून देशवासियांना लॉक डाऊन हा शब्द कळला .या लॉक डाऊन ने वर्षभरात देशवासीयांची पाठ सोडलेली नाही .
बीड जिल्ह्यात साधारणपणे मे पासून कोरोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली .त्यावेळी एक रुग्ण सापडला तर घाबराहट निर्माण व्हायची,हळूहळू हा आकडा शंभर,दोनशे,तीनशे पार गेला अन कोरोना बीड करांच्या अंगवळणी पडला .
गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यात 21458 लोकांना कोरोनाची बाधा झाली तर वर्षभरात 19732 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत .आज जिल्ह्यातील रुग्णालयात मिळून 1722 रुग्णांवर उपचार सुरू आहेत .जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे 598 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .
जिल्ह्यातील तब्बल 4 लाख 43308 लोकांचे क्वान्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले आहे .आजही बीड जिल्ह्यात 400 पर्यत बेड शिल्लक आहेत,मात्र बीडचे नागरिक ज्या पध्दतीने वागत आहेत ते पाहता लवकरच जिल्ह्यात एकही बेड शिल्लक राहिल की नाही अस चित्र दिसत आहे .