बीड – मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीड जिल्हा प्रशासनाकडून कोरोना बाबत होत असलेल्या कारवाई आणि नियोजनाबाबत आढावा घेतला .त्यांनी बीडच्या दौऱ्यात शनिमंदिरात जाऊन दर्शन घेत अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,शाळा यांना भेटी देत लोकांशी चर्चा केली .

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली,बीडमध्ये वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता कडक निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या .

केंद्रेकर यांनी नागरिकांची बेफिकिरी जीवावर बेतेल अस सांगत मास्क चा वापर न करणाऱ्यांना फटके द्या अस सांगत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले .

आपली आढावा बैठक संपल्यानंतर केंद्रेकर यांनी बीडच्या शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले,त्यानंतर खान्देश्वरी भागात जाऊन पाहणी करत विकासकामांसाठी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर केला .त्यानंतर त्यांनी गेवराई तालुक्यातील गढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करत सूचना केल्या,तसेच गौडगाव येथील अंगणवाडी आणि शाळेला भेट देत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधला .

केंद्रेकर यांच्या या दौऱ्यामुळे कोरोना ला अटकाव करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन कामाला लागेलं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .