बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा बुधवारी पुन्हा एकदा 266 पार गेला आहे .तपासण्या वाढल्या असल्याने पॉझिटिव्ह रुग्णसंख्या देखील वाढत आहे हे खरे असले तरी बीड,माजलगाव, अंबाजोगाई येथील रुग्णांचा वाढत असलेला वेग काळजी करायला लावणारा आहे .लोकहो काळजी घ्या नियम पाळा अन्यथा कोरोनाचा शिरकाव घरापर्यंत येण्यास वेळ लागणार नाही .





बीड जिल्ह्यात प्राप्त अहवालात वडवणी 4, शिरूर 4 ,पाटोदा 9 ,परळी 15,गेवराई 18 ,केज 8,माजलगाव 35 , धारूर 4, बीड 100 आष्टी 9 आणि अंबाजोगाई येथे 60 इतके रुग्ण आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील रुग्णांचा वाढता आकडा हा चिंतेत भर घालणारा असून लोकांनी नियम पाळणे गरजेचे झाले आहे .