April 13, 2021

होम आयसोलेशन परवानगी, बार,रेस्टॉरंट सुरू होणार !

होम आयसोलेशन परवानगी, बार,रेस्टॉरंट सुरू होणार !

बीड – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण हे लक्षणे नसणारे आहेत. त्यामुळे त्यांना होमआसोलेशन द्यावे अशी मागणी होत होती. राज्य सरकारनेही तसा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. या पार्श्‍वभूमीवर आता होमआसोलेशन द्यायला जिल्हाधिकार्‍यांनी मंजूरी दिली आहे तसेच पन्नास टक्के क्षमतेने हॉटेल,बार,रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे .

बीड जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे हॉटेल,बार, रेस्टॉरंट, खानावळी, चहाचे गाडे यावर लावलेली बंदी जिल्हा प्रशासनाने शिथील केली आहे. आता हे सर्व व्यवसाय 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी हे आदेश दिले.

बीड जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्यानंतर हॉटेल, बार, खानावळी, चहाचे गाडे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते. या बंदी आदेशाविरोधात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत होते. व्यापारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून त्यांना निवेदने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी बंदी आदेशात सुधारणा केल्या असून आता निम्म्या क्षमतेने हॉटेल, खानावळी, बार, चहाचे गाडे सुरू ठेवता येणार आहेत. मात्र या ठिकाणी मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जावू नये असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

नवीन आदेशानुसार आता शॉपिंग मॉल देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबून सुरू ठेवता येणार आहेत. मात्र त्या ठिकाणी गर्दी होवू नये याची जबाबदारी मालकांना घ्यावी लागणार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *