December 6, 2022

वाझे प्रकरणी परमवीर सिंग यांची विकेट पडणार !

वाझे प्रकरणी परमवीर सिंग यांची विकेट पडणार !

मुंबई : सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील पोलीस दल आणि सरकारमध्ये खळबळ उडाली असून स्वतः शरद पवार यांनी यात कोणीही मोठा अधिकारी असला तरी त्याला घरी पाठवा अशी भूमिका घेतल्याने आणि वाझे प्रकरणात परमवीर सिंह यांचे नाव येऊ लागल्याने त्यांची विकेट पडणार अशी चर्चा आहे,याबाबत सकाळपासूनच वर्षावर सर्वपक्षीय खलबते सुरू असून परमवीर सिंह यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे .

सचिन वाझे प्रकरणात सरकारची मोठी अडचण होताना दिसत आहे. तसेच मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या आहेत, हे एनआयएच्या चौकशीत पुढे येत आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्तांवर याचं खापर फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची महत्वाच्या मंत्री आणि नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. सचिन वाझेंप्रकरणी ही बैठक सुरु असल्याची माहिती आहे. या बैठकीत मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली तर नवी मुंबई पोलीस आयुक्त कोण असणार याबाबतही अंदाज लावले जात आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये रजनीश शेठ, सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, बी. के. उपाध्याय, डॉ. के. वेंकटेशम यांची नावं चर्चेत आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click