April 12, 2021

बीडची चिंता वाढली !तब्बल 283 पॉझिटिव्ह !

बीडची चिंता वाढली !तब्बल 283 पॉझिटिव्ह !

बीड – कोरोना बीड वासीयांची पाठ सोडायला तयार नाहीये,जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा बुलेट ट्रेन च्या स्पीड ने वाढतो आहे .दररोज किमान दोनशे पेक्षा अधिक लोक पॉझिटिव्ह येत आहेत .मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा एकदा हा आकडा 283 इतका झाला आहे .ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन गतीने कामाला लागले असले तरी नागरिकांची बेफिकिरी वाढल्याने आकडा कमी होण्याची चिन्हर दिसत नाहीत .

बीड जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 4 ,शिरूर 3 ,पाटोदा 10 ,परळी 24 ,गेवराई 15 ,केज 14 ,माजलगाव 41 ,धारूर 5 बीड 94 आष्टी 15 आणि अंबाजोगाई मध्ये 58 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यातील आकडे हे चिंता वाढवणारे आहेत.बीड करांनी काळजी न घेतल्यास घरात बसावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही .जिल्हा रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने आता आयटीआय, पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात येत आहे,मात्र तेथे देखील रुग्ण वाढत असल्याने आणखी कोविड सेंटर वाढवावे लागतील अशी शक्यता आहे .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *