April 13, 2021

जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या !

जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या !

बीड – बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका शेतकऱ्याने गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे,सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा आहे .घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत तपास सुरू केला आहे .

अबोल भोसले याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते,त्याने यापूर्वी देखील पुण्यात असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता .त्यानंतर तो जिल्ह्यात गावी आला होता .गतवर्षी शेतात फारसे उत्पन्न झाले नाही,त्यात कर्ज डोक्यावर झाले त्यात आजारी पडल्यामुळे त्याला बीडच्या नाळवंडी नाका परिसरात असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते .

सोमवारी सकाळी त्याने गच्चीवर जात वरून उडी मारली,यात त्याचा मृत्यू झाला .घटनास्थळी पेठ बीड पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली .या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *