बीड – पेट्रोल पंपावर गोंधळ घालून मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी दोन पोलिसांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे .विशेष म्हणजे हे दोघे शिवसैनिक आहेत अशी माहिती आहे .थेट पोलिसांवरच हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे .
शहरातील बार्शी रोड भागात असलेल्या पेट्रोल पंपावर दोन जण गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले .या दोघांनी डिझेल चे पैसे न देता मॅनेजर आणि कर्मचारी या दोघांना बेदम मारहाण केली होती .
या प्रकारानंतर संदिपान बडगे आणि अभिषेक पवळ या दोघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले .त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस जालिंदर बन्सोडे यांना बडगे आणि पवळ यांनी बेदम मारहाण करीत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली .
हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी या दोघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे .कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना ज्यांनी मारहाण केली ते शिवसैनिक असल्याने खळबळ उडाली आहे .