बीड – जिल्ह्यातील अडीच हजाराच्या आसपास रुग्णांची तपासणी केली असता त्यात 248 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सलग तिसऱ्या चौथ्या दिवशी बीड शहर अन तालुक्याचा आकडा शंभर पार गेला आहे .बीड करांनी कोरोनाला गोंजारायच ठरवलेलं दिसतंय,त्यामुळे बीडचा आकडा कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत .



बीड जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 3,शिरूर 3,पाटोदा 5, परळी 6,माजलगाव 27,केज 11,गेवराई 15,धारूर 4,बीड 115आष्टी 9 आणि अंबाजोगाई मध्ये 50 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत .
बीड जिल्ह्यात प्रशासनाने रात्री सात पासून सकाळी सातपर्यंत नाईट कर्फ्यु लावलेला असताना देखील सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह चा आकडा दोनशे पार गेला आहे .यामध्ये बीड,अंबाजोगाई आणि माजलगाव चे आकडे चिंताजनक आहेत .प्रशासनाने जिल्ह्यातील सहा ठिकाणी जुने बंद केलेले सीसीसी सेंटर पुन्हा सुरू केले आहेत .
दिवसेंदिवस वाढत असलेला आकडा चिंतेत भर टाकणारा आहे,नागरिकांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा संपूर्ण लॉक डाऊन शिवाय पर्याय राहणार नाही हे निश्चित .