बीड – एकीकडे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे,दुसरीकडे जिल्हा रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे,रुग्णांना दिले जाणारे आणि उरलेले अन्न अक्षरशः उघड्यावर टाकण्यात आल्याने दुर्गंधी पसरली आहे .
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा याबाबत बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने बऱ्यापैकी यश मिळवले होते .मात्र मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाली आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढासळली .

मात्र गेल्या महिनाभरपसून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयात सुविधा बाबत ओरड सुरू झाली आहे .जिल्हा रुग्णालयात असलेल्या रुग्णांना जे जेवण दिले जाते त्याचा दर्जा बाबत कोणी आक्षेप घेतलेला नाही,कारण बहुतांश रुग्ण हे घरूनच जेवण मागवतात .
मात्र ज्या रुग्णांना जेवण दिले जाते त्या प्लेट, द्रोण,खरकटे कागद,उरलेले शिळे अन्न हे जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या झाडाखाली चक्क उघड्यावर टाकले जात आहे .ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी किमान स्वच्छता अपेक्षित आहे .मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गित्ते यांचे याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे .