बीड – बीड जिल्हा वासीयांचा निष्काळजीपणा जीवावर बेतणार अस दिसू लागलं आहे .कारण शनिवारी 181 पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी पॉझिटिव्ह चा आकडा तब्बल 263 पर्यत पोहचला,विशेष म्हणजे यात 123 रुग्ण हे बीड शहर आणि तालुक्यातील आहेत .बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर काही दिवस लॉक डाऊन करावे लागेल हे निश्चित .




बीड जिल्ह्यातील लोक दिवसेंदिवस निष्कळजीपणे वागत असल्याचे चित्र दिसत आहे .त्याचा परिणाम हा पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आल्यावर होत आहे .बीड जिल्ह्यात रविवारी तब्बल 263 रुग्ण आढळून आले आहेत .
रविवारी 2641 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 263 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत .यामध्ये वडवणी 2,शिरूर 5,पाटोदा 5,परळी 13,माजलगाव 19,केज 15,गेवराई 9,धारूर 2,बीड 123,आष्टी 15,अंबाजोगाई 52 रुग्ण सापडले आहेत .