July 28, 2021

वाझे यांनीच स्फोटक बाळगली,एन आय ए कडून अटक !

वाझे यांनीच स्फोटक बाळगली,एन आय ए कडून अटक !

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटक ही पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच जवळ बाळगली होती आणि त्या ठिकाणी गाडी पार्क केल्यावर पांढऱ्या इनोव्हा मधून स्वतः वाझे हेच या गाडीसोबत होते आशा धक्कादायक महितीनंतर एन आय ए ने वाझे यांना रात्री अटक केली .या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी देखील वाझे यांना सहकार्य केल्याची माहिती मिळाली आहे .हा सगळा प्रकार धक्कादायक असल्याने आणखी काही मोठ्या लोकांना अटक होऊ शकते .

मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात शनिवारी उशिरा रात्री एक मोठी घडामोड घडली. या प्रकरणात संशयाची सुई असणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर एनआयए कडून अटक करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मुंबईतील एका हाय प्रोफाइल परिसरात गाडीत स्फोटकं सापडलेल्या प्रकरणात वाझे यांची चौकशी करून त्यांना अटक केली गेली आहे.

दरम्याना अशी माहिती समोर येते आहे की, स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणाच्या कटात 5-7 जणांचा समावेश होता.

सूत्रांनुसार, NIA ने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये खळबळ उडाली आहे. आता या घटनेची पाळमुळं कुठवर जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

एनआयएच्या तपासात आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे ठाणे याठिकाणाहून आणखी 3 जणांच्या अटकेची शक्यता आहे. याप्रकरणी इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाला अटक होऊ शकते.

दरम्यान या पांढऱ्या इनोव्हा गाडीबाबत देखील एनआयएच्या तपासात मोठा उलगडा झाला आहे. NIA ने ही गाडी शोधून काढत ती NIA च्या मुंबई कार्यालयात आणली आहे. एनआयएचे हे मोठे यश मानले जात आहे. त्यामुळे गेले काही दिवस जे पांढऱ्या गाडीचे गूढ होते, ते संपुष्टात आले आहे.

ही इनोव्हा ठाण्यातील एका व्यावसायिकाची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सचिन वाझे यांनी स्फोटक बाळगळी असा आरोप NIA ने केला असून लवकरच पांढऱ्या रंगांच्या इनोव्हाचा लेखाजोखा एनआयए आज जाहीर करणार आहे. ही गाडी सापडल्याने मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *