बीड – बलात्कार प्रकरणातील आरोपी सोबत दारूपार्टी करणाऱ्या पोलिसांना एसपी आर रामस्वामी यांनी तडकाफडकी निलंबित केले मात्र दोन नंबर वाल्याकडून पैसे गोळा करून ग्रामीण पोलीस ठाण्यात अवैध इमारत उभारणाऱ्या वर मात्र कोणतीच कारवाई न करता पाठीशी घातले जात असल्याचे दिसत आहे .
बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपोसोबत सपोउनि एन डी धनवडे आणि शिपाई एस डी गर्जे या दोघांनी दारूपार्टी केली होती,ही बाब माध्यमांमधून समोर येताच एसपी यांनी तातडीने दोघांना निलंबित केले .
मात्र दुसरीकडे बीड ग्रामीण ठाण्याचा पदभार असताना तब्बल वीस लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च करून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सपोनि सुजित बडे यांचा कारभार समोर आणल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही .
बडे यांच्या कारनाम्याची साक्ष देणारी इमारत आजही बीड ग्रामीण ठाण्यात उभी आहे,हे प्रकरण समोर आल्यानंतर बडे वैद्यकीय रजेवर गेले,नंतर रुजू झाले ,या प्रकरणात आ संदिप क्षीरसागर यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिले होते .
मात्र एस पी आर रामस्वामी यांनी गृहमंत्र्यासह आ संदिप क्षीरसागर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बडे यांच्यावर आपली कृपादृष्टी कायम।ठेवली आहे .