बीड – लोकहो कन्फ्युज होऊ नका,जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की जिल्ह्यातील किराणा दुकान,मेडिकल आणि दूध विक्रेते वगळून जिल्ह्यातील बार,रेस्टॉरंट, खानावळ,चहाचे हॉटेल,पान टपरी इत्यादी आज संध्याकाळी सात वाजेपासून बंद करावी लागणार आहेत,आणि ती अनिश्चित काळासाठी उघडता येणार नाहीत तर या शिवाय इतर दुकाने ज्यात कपडा,स्टील,फर्निचर,कटिंग सलून, इस्त्री, जनरल स्टोर,इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल,व इतर दुकाने सायंकाळी सात ते सकाळी सात पर्यंत सुरू ठेवता येणार नाहीत,त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता आदेश नीट समजून घ्या अन पालन करा नाहीतर कारवाईला सामोरे जावे लागेल .
बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दुपारी एक वाजता काढलेल्या आदेशामुळे लोकांत,व्यापारी वर्गात कन्फ्युजन वाढले आहे .अनेकांनी कधीपासून बंद होणार हे समजत नसल्याचे फोनवरून आम्हाला कळवले .
त्यामुळे आम्ही हे कन्फ्युजन दूर करत आहोत .मंगल कार्यालय आणि फंक्शन हॉल हे 18 पासून अनिश्चित काळासाठी बंद असतील बाकी सर्व बार,रेस्टॉरंट, हॉटेल,पान टपरी,खानावळ हे आज (13 मार्च पासून)सायंकाळी सात नंतर पुढील आदेश येईपर्यंत म्हणजे अनिश्चित काळासाठी कायम बंद असतील .म्हणजेच रात्री नऊ दहा वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवता येणार नाही .
केवळ आणि केवळ मेडिकल,किराणा दुकानं आणि इतर अत्यावश्यक सेवा या सायंकाळी सात नंतर देखील सुरू राहतील,त्यामुळे कोणीही कन्फ्युज होऊ नये .याचाच अर्थ असा आहे की संपूर्ण व्यापरपेठ ही सायंकाळी सात वाजता आजपासून बंद होईल .जे या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल .