बीड – जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी पुन्हा एकदा दोनशेच्या आसपास गेला .तब्बल 181 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात एकट्या बीडचे 82 रुग्ण आहेत .बीड आणि अंबाजोगाई मधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे .




बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा वीस दिवसात रुग्णसंख्या तब्बल हजार बाराशेच्या घरात गेली आहे .रुग्ण वाढण्याचा रेट 15 टक्के च्या आसपास गेला आहे .आजही हजरो लोक कोणतेही नियम न पाळता फिरत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे .
शनिवारी आलेल्या अहवालात वडवणी 5,शियूर 5,पाटोदा 2,परळी 7,माजलगाव 5,केज 12,बीड 82,आष्टी 18,अंबाजोगाई 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .