नगर – अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपीज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे यांना तीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळ बोठे यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. जरे यांची हत्या झाल्यापासून बोठे हा फरार होता,न्यायालयाने त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते .
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा घाटात गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केली होती. यातील आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे हे फरार होते. त्यांचा तपास तब्बल तीन महिन्यांनी पोलिसांना लागला असून त्यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे.
रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली
हैदराबाद येथील एका हॉटेल मध्ये बोठे हा लपून बसला होता,तो ज्या रूममध्ये होता त्या रूमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते,त्याच्यासोबत एका वकिलाला देखील अटक करण्यात आली आहे,नगर पोलिसांच्या सहा पथकांनी त्याचा माग काढला .