बीड – गेवराई तालुक्यातील गोदावरी पट्यात वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे,पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने तब्बल 58 लाख रुपयांची वाळू अन वाहने पकडली,मात्र दुसरीकडे गंगावाडी येथे एका शेतकऱ्याला चिरडून फरार झालेल्या वाहन चालक अन मालकाला अद्याप चकलांबा पोलिसांना अटक करता आलेली नाही .कारण गाडीचा मालक हा पोलीस आहे त्यामुळे अद्याप तो सापडत नसल्याने पोलिसांच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
आज सकाळी 9.30 वा सावरगाव या गावाजवळ गोदावरी नदीपत्रामध्ये वाळू भरून चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना त्यांच्यावर छापा मारला असता 08 ट्रॅक्टर वाहने पकडण्यात आले आहेत. जप्त करण्यात आले आहेत. तसेच नमूद ट्रॅक्टर चालक व मालक असे 16 आरोपीतांच्या विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद देऊन गेवराई पोलीस ठाणे येथे भा.द.वि.379,109,511 सह कलम मो.वा.का.126/177, 39/192,235(2)/177 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या गुन्ह्यात 8 ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण 5820,000/- रु किंमतीचा मुढेमाल जप्त करण्यात आला आहे.
बीडचे विशेष पथक हे वाळू माफियाविरुद्ध जोरदार कारवाई करत आहे .शेकडो ब्रास वाळू,वाहने जप्त केली जात आहेत .मात्र गंगावडी येथे वाहनाखाली चिरडून जो शेतकरी मृत पावला त्या वाहनाचा चालक हा पोलीस शिपाई असल्याचे समोर आल्यानंतरही त्याला अटक झालेली नाही .
एकीकडे पेठ बीड पोलिस ठाण्याचे प्रमुख पाटील यांना गुटख्याचा माफिया मुळे आबा सापडत नाही,दुसरीकडे वाळू माफिया असलेला पोलिस शिपाई सापडत नाही,तिसरीकडे अब्रू घेणाऱ्या सोबत पोलिसच दारूपार्टी करत आहेत अन अतिरेक म्हणजे दोन नंबर वल्याकडून लाखोंची माया गोळा करून अवैध बांधकाम करणाऱ्या बडे सारख्याला पाठीशी घातले जात आहे .
बीड पोलीस दलात कुंपनच शेत खाऊ लागलं आहे त्यामुळे दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे .