बीड – बीड शहर वासीयांची निष्काळजी जीवाशी येणार अस दिसु लागले आहे,कारण शुक्रवारी आलेल्या अहवालात एकूण जिल्ह्यात 163 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून त्यात बीडचा आकडा शंभर आहे .बीड शहर वासीयांनी जर काळजी नाही घेतली तर लॉक डाऊन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही .




बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे .पंधरा दिवसात दररोज किमान शंभर ते दिडशे रुग्ण आढळून येत आहे .त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह इतर सीसीसी सेंटर सुरू करण्यात आले आहेत .
शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 1,शिरूर 3,पाटोदा 2,परळी 7,माजलगाव 8,केज 1,गेवराई 9,धारूर 1,बीड 100,आष्टी 4 आणि अंबाजोगाई 27 रुग्ण आढळून आले आहेत .