April 12, 2021

हाय पॉवर मुळे माळीवेस कार्यालयातील उपकरण जळाली !

हाय पॉवर मुळे माळीवेस कार्यालयातील उपकरण जळाली !

बीड – अचानक न्यूट्रल फेज एक झाल्याने बीडच्या माळीवेस भागातील महावितरण च्या कार्यालयातील संगणक,फॅन आणि इतर साहित्य हाय पॉवर मुळे जळून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली .मात्र याची खबरबात स्वतः उपअभियंता यांनाच नव्हती हे विशेष .

बीडच्या माळीवेस भागात असलेल्या महावितरण च्या कार्यालयात मेन लाईन वरून आलेल्या वीजपुरवठ्यात अचानक बिघाड झाला .न्यूट्रल आणि फेज एक झाल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला .त्यामुळे उपअभियंता यांच्या कार्यालयातील तसेच आजूबाजूच्या कार्यालयात असलेले संगणक,फॅन आणि इतर साहित्य जळाले .

याबाबत माहिती घेण्यासाठी उपभियंता पाटणकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना विचारले असता अस काही घडलं आहे की नाही माहीत नाही,माहिती घेतो,दोन तासांनी येऊन भेटा अशी उत्तरे देत त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *