बीड – बेकायदेशीर पैशातून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सुजित बडे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे एसपी आर रामस्वामी हे आरोपिसोबत दारू पार्टी करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकवर तरी कारवाई करणार का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे .
बीड जिल्हा पोलिस दलात अधिकारी आणि कर्मचारी यांची मनमानी मोठ्या प्रमाणात वाढली आहे .एकीकडे एसपीचे पथक वाळू,मटका,जुगार यावर कारवाई करत असताना दुसरीकडे ठाणे प्रमुख मात्र लक्ष्मी दर्शनात व्यस्त आल्याचे चित्र आहे .
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन सपोनि सुजित बडे यांनी दोन नंबर वाल्यांकडून पैसे गोळा करून वीस लाखाचे बांधकाम कोणतीही परवानगी न घेता उभारले .याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आ संदिप क्षीरसागर यांनी तक्रार केली .
मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याऐवजी रजेवरून रुजू झालेल्या बडे यांना पोलिस अधीक्षक यांनी पाठीशी घातले .त्यामुळे इतर अधिकाऱ्यांची देखील हिंमत वाढली .दरम्यान बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपी सोबत एका सहायक पोलिस निरीक्षकाने चक्क बार मध्ये बसून दारूपार्टी केली .
हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता आर रामस्वामी हे या वर कारवाई करतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .बडे यांना ज्या पद्धतीने पाठीशी घातले तसाच प्रकार येथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
बीड पोलीस दलात हे खाबूगिरी आणि तोडीपाणी करणारे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पोलीस दलाची प्रतिमा डागाळत आहे,मात्र पोलीस प्रमुखांना त्याच्याशी देणंघेणं नसल्याचं दिसून येत आहे .