पुणे – राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकळल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात रस्त्यावर आंदोलन सुरू केलं आहे,भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील आंदोलस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत आंदोलन सुरू केलं आहे .दरम्यान परीक्षा पुढे धकळण्याच्या निर्णयाचा कॉन्ग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी देखील निषेध केला आहे .
राज्य सरकारच्या वतीने एमपीएससी मार्फत विविध पदांसाठी 14 मार्च रोजी परीक्षांचे आयोजन केले होते .यापूर्वी पाच वेळा या परीक्षा रद्द झाल्या आहेत .यावेळी परीक्षा होणार म्हणून ग्रामीण भागातून विद्यार्थी परीक्षा केंद्रकडे दाखल झाले होते
दरम्यान राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत अचानक ही परीक्षा पुन्हा एकदा रद्द करण्याची फर्मान काढले .हा निर्णय कळताच पुण्यात शास्त्री चौकात हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे .
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या आंदोलनात उडी घेत थेट रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे .हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनि बळाचा वापर करत लाठीचार्ज केला आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.
मात्र परीक्षण रद्द झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे .दरम्यान सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजप,काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी निषेध केला आहे .