मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनाचा समारोप करताना विरोधकांना चिमटे काढत भाजपमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं दाखवून दिलं .धनंजय मुंडे यांचा विजय झाला मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे की त्यांच्या विरोधी उमेदवाराचा पराभव कोणामुळे झाला अस म्हणत पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्या पराभवाला कोण जबाबदार आहे असा सवाल उपस्थित केला .त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या पराभवाची चर्चा सुरू झाली आहे .
काही जणांना तिकीट देतो असं सांगून बायकोला तिकीट भरायला लावले आणि बायकोचे तिकीट नाकारले आणि त्यालाही तिकीट मिळाले नाही. आमचे धनंजय मुंडे परळी मतदार संघातून विजयी झाले तिथे त्यांचा (पंकजा मुंडे) पराभव झाला. त्यांचा पराभव धनंजय यांच्यामुळे झाला की दुसऱ्या कुणामुळे झाले हे काही माहिती नाही’ अस सूचक विधान करत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
अधिवेशन सुरू झाल्यापासून सुधीर मुनगंटीवार हे सरकार पडणार, सरकार बरखास्त होणार, राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे, अशी विधानं केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहे. मराठी मध्ये एक म्हण आहे ‘सहन ही होत नाही, सांगता ही येत नाही’ काही जणांना आपण या सरकारमध्ये नाही याचे शल्य प्रचंड बोचत आहे. त्यामुळे ते कधी नाना पटोले यांच्यावर घसरले, तर केदार यांच्यावर टीका करत होते’ असा टोला अजितदादांनी लगावला.
‘तुम्ही फार डोळ्यावर यायला लागले की बाजूला केलं जातं. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे. त्यांची काय अवस्था केली हे सर्वांनी पाहिले. खडसे यांच्यासोबत घडल्यानंतर काही जणांना आपण वाचलो असं वाटत होतं पण काही जणांचा विधानसभेत पराभव झाला. काही जणांना तिकीटं मिळाली नाही’ असा टोलाही अजितदादांनी लगावला.