बीड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 मार्च पर्यंत बंद ठेवलेल्या पाचवी ते नववी च्या शाळा आणि अकरावीच्या कॉलेज चे वर्ग आता मार्च एन्ड म्हणजे 31 मार्च पर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद जगताप यांनी दिले आहेत .

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार बीडचे जिल्हाधिकारी जगताप यांनी 10 मार्च पर्यंत पाचवी ते नववी आणि अकरावी च्या शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले होते .
दरम्यान प्रशासनाने बुधवारी स्वतंत्र आदेश काढून 31 मार्च पर्यंत शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश नव्याने काढले आहेत .त्यामुळे या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे .31 मार्च पर्यंत शाळा बंद ठेवल्यास परीक्षा होणार की नाही याबाबत पालक वर्गाने शंका व्यक्त केली आहे .