बीड – जिल्ह्यातील 1063 रुग्णांची तपासणी करण्यात आली असता 110 पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात सर्वाधिक 57 रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत .बीड वासीयांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरात लॉक डाऊन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही .




बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून बीड तालुक्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे .बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात रुग्णसंख्या आठशे पेक्षा अधिक झाली आहे .
जिल्ह्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 2,शिरूर 1,पाटोदा 2,परळी 4,माजलगाव 13,केज 4,गेवराई 5,धारूर 1,बीड 57,आष्टी 11,आणि अंबाजोगाई मध्ये 10 रुग्ण सापडले आहेत .
बीड तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असून यावर नियंत्रण न आल्यास बीडमध्ये लॉक डाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही .आजपासून व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट सुरू झाल्याने उद्यापासून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे,त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .