बीड – विधानपरिषद चे आमदार सुरेश धस यांनी अर्थसंकल्प चर्चेत कोरोना काळात सर्वसामान्य व्यापारी,भाजी विक्रेते,सुतार,न्हावी अशा बारा बलुतेदारांना काय काय सहन करावा लागलं याचा पाढा वाचत मंगल कार्यलय मालकांवर फाशी घेण्याची वेळ सरकारने आणल्याचा आरोप केला .कोरोना संपू नये असं वाटणारी एक टोळी कार्यरत असल्याचा आरोप करीत धस यांनी राज्यात कायदा अन सुव्यवस्था अबाधित नसल्याचा घणाघाती आरोप केला .
राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी सादर झाला,त्यावर बोलताना विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांनी सरकारवर चौफेर हल्ला केला .राज्यात गुंडाची हिम्मत एवढी वाढली की गजा मारणे सारखा गुंड 400 वाहन घेऊन मुंबईहून पुण्याला येतो अन गृहखाते उघड्या डोळ्यांनी बघत बसत,गबरु शेठ अजून सापडला नाही,अरुण राठोड बेपत्ता आहे,राज्यात कायदा शिल्लक आहे का असा सवाल धस यांनी केला .
कोरोना काळात वरपासून खालपर्यंत वेगवेगळे आदेश निघाले, पुण्यात लग्नाला 200 लोकांना परवानगी अन बीड जिल्ह्यात 50 लोकांना परवानगी, हे काय चालले आहे ?मंगल कार्यालय मालकांवर फाशी घेण्याची वेळ आली आहे .
बीडच्या जिल्हाधिकारी यांनी बाजरपेठा बंद केल्या,आठवडी बाजार बंद केले,कोचिंग क्लास,शाळा बंद केल्या,व्यापाऱ्यांना अँटिजेंन ची सक्ती केली .हे सरकार हुकूमशाही पध्दतीने वागत आहे असं सांगत धस यांनी सरकारच्या काळात 450 रुपयांना जेवणाच ताट दिल गेलं,यातून ठराविक लोक गब्बर झाले असा आरोप केला .
राज्यात वाळू माफियांमुळे दहशत निर्माण झाली आहे,गोरगरीब लोकांना वाळू मिळत नाही,त्यामुळे वाळू घाटाबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी देखील धस यांनी केली .