मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे आ राहुल नार्वेकर यांची निवड झाली.महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा नार्वेकर यांनी पराभव केला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना भाजपचा हा पहिला मोठा विजय मानला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.त्यानंतर शिवसेना भाजपच्या या नव्या सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी […]
राहुल नार्वेकर होणार विधानसभा अध्यक्ष !
मुंबई- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तानाट्याला पूर्णविराम लागला.भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे,त्यामुळे आता सासरे जावई दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष सभापती असणार आहेत. राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. […]
शनिवारी नव्या सरकारची बहुमत चाचणी !
मुंबई- राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारची बहुमत चाचणी शनिवारी होणार आहे.शनिवार अन रविवारी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन होईल,यामध्ये नव्या सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाला गुरुवारी पूर्णविराम मिळाला.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर या दोघांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. […]
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री !
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात शपथ घेतली.दुपारी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण कुठलेही पद घेणार नाही असे म्हटले होते मात्र दिल्लीतून सूत्र हलली आणि संध्याकाळी शिंदे यांच्यासोबत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आलेल्या भूकंपानंतर भाजपच्या […]
एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस !
मुंबई – राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी साडेसात वाजता शपथ घेतील अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या शिंदे यांना भाजप आणि अपक्ष साथ देतील अशी माहिती त्यांनी दिली.भाजपने हा निर्णय घेऊन सर्वानाच मोठा धक्का दिला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी […]
अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली.लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.त्याचसोबत […]
सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला दणका !
नवी दिल्ली- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी विश्वास दर्शक ठराव मांडण्याचा दिलेला आदेश रद्द करावा अशी मागणी करणारी शिवसेनेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही,अगोदर विश्वास दर्शक ठरावावर स्थगिती नाही असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदारांनी […]
मुख्यमंत्री ठाकरेंचा राजीनामा ?
मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि राज्यपाल यांनी 30 जून रोजी विश्वास दर्शक ठरावाचे दिलेले आदेश लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर करण्यावरून ते राजीनामा देतील अशी माहिती आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकम्प आला.शिंदे आणि […]
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात – भाजप !
मुंबई – राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने त्यांना विश्वास दर्शक ठराव सादर करण्यास सांगावे अशी मागणी करण्यात आली आहे,याबाबत राजभवनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल 52 आमदारांनी बंडखोरी […]
देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला !
मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत.त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी करत आठवडा भरापूर्वी गुवाहाटी ला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. […]