बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड मतदार संघाचे आ संदिप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.बीड मतदारसंघात अनेक कामावर स्थगिती असल्याने ती उठवण्यात यावी अन मतदारसंघात नव्याने विकास कामांना मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी आ क्षीरसागर यांनी केली.मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. बीड विधानसभा मतदारसंघ 2022-23 या आर्थिक वर्षातील विविध विकासकामांवरील स्थगिती उठविण्यात […]
मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस !
बीड- माजीमंत्री तथा आ धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दिन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर बुधवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या वाहनाला 4 जानेवारी रोजी रात्री अपघात झाला होता.यामध्ये मुंडे हे जखमी झाले.त्यांना तातडीने मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
सत्ता नसतानाही माजीमंत्री क्षीरसागर यांचे वर्चस्व कायम !
बीड – बीड आणि शिरूर तालुक्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाने बाजी मारली असून सत्ता नसतानाही मतदारसंघातील 71 ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. काल निकालाच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून विजयी उमेदवारांचे संपर्क कार्यालयात माजी मंत्री क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर यांनी भव्य स्वागत केले. बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये […]
चौसळ्यात ओन्ली लोढा !
बीड बीड तालुक्यातील सर्वात मोठ्या अन प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या चौसाळा ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पॅनलचा धुवा उडाला असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे सहकारी असणारे प्रेमचंद लोढा यांच्या पॅनल चा मोठा विजय झाला आहे लोढा यांच्या पत्नी मंगल या सहाशे पेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील सातशे पेक्षा अधिक ग्रामपंचायत […]
बजरंग सोनवणेंच्या मुलीचा पराभव !
केज- नगर पंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा हर्षदा सोनवणे चा पराभव झाला आहे. या ठिकाणी अशोक पाटील गटाच्या उमेदवाराचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या मुलीने केज नगर पंचायत साठी अर्ज भरला होता.मात्र तेथे तिचा पराभव झाला. त्यानंतर बजरंग सोनवणे […]
कण्हेरवाडीत राजेभाऊ फड यांचा विजय !
परळी- तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत वर एकतर्फी विजय मिळणाऱ्या धनंजय मुंडे यांना शहरानजीक असणाऱ्या कण्हेरवाडी ग्रामपंचायत वर रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्या मातोश्री प्रभावती फड यांचा विजय झाला आहे.हा धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत असल्याचे चित्र […]
गेवराईत अमरसिंह पंडितांचा डंका !
गेवराई- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भाजपचे विद्यमान आ लक्ष्मण पवार आणि माजीमंत्री बदामराव पंडित या दोघांना चांगलाच दणका दिला आहे.दुपारपर्यंत हाती आलेल्या 30 ग्रामपंचायत निकलांपैकी 19 ग्रामपंचायत अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात आल्या आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी सलामी दिली असून महत्वाची समजली जाणारी वडगाव ढोक ग्रामपंचायतीवर […]
प्रतिष्ठेच्या पांगरी सह मोठ्या ग्रामपंचायत वर भावाचा बहिणीला धक्का !
परळी- वैद्यनाथ कारखाना,स्व गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ ज्या ठिकाणी आहे त्या पांगरी ग्रामपंचायत सह महत्वाच्या अन मोठ्या ग्रामपंचायत ताब्यात घेत भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.ज्या ठिकाणी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे,स्व गोपीनाथ मुंडे यांची समाधी आहे त्या पांगरी ग्रामपंचायत मध्ये […]
राजुरीत पुतण्याचा काकाला धोबीपछाड ! सर्कलमध्ये दबदबा !!
बीड- आ संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर या काका पुतण्या मधील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पहावयास मिळाला.राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर माजीमंत्री क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत आ संदिप क्षीरसागर यांनी काकाला धोबीपछाड दिला आहे.या सर्कलमधील चार ग्रामपंचायत आ क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत. गेल्या पाच सात वर्षांपासून आ […]
केकतपांगरी मध्ये राडा !
गेवराई- तालुक्यातील केकतपांगरी या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत तुफान राडा झाला.भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने गावात तणाव निर्माण झाला. बोगस मतदानावरून बाचाबाची सुरू झाली अन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. बीड जिल्ह्यातील 700 पेक्षा अधिक ग्रामपंचायत साठी रविवारी सकाळी शांततेत मतदान सुरू झाले.महसूल आणि पोलीस प्रशासन सतर्क असल्याने दिवसभरात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे दिसले नाही. […]