बीड – टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याच्या नावाने बोगस रुजू आदेश आणून नोकरी मिळवणाऱ्या एका शिक्षिकेसह बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.परभणीचे सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्यामुळे बोगस नोकरीचे आदेश काढून फसवणूक करणाऱ्यांना दणका बसला आहे.विशेष म्हणजे यातील शिक्षिका ही बीड जिल्ह्यातील आहे,त्यामुळे पुन्हा एकदा बोगसगिरी मध्ये बीडचे नाव बदनाम झाले आहे. राज्यात झालेल्या […]
पोलीस भरतीमध्ये घोटाळा ! बीडच्या तिघांसह दहा जणांना अटक !!
बीड – टीईटी, आरोग्य विभाग,म्हाडा नंतर आता पोलीस भरती मध्ये देखील बीडच्या काही लोकांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.डमी उमेदवार म्हणून तीन वेळा परीक्षा देणाऱ्या सह दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकाराने खळबळ उडाली आहे.अटक केलेल्या आरोपीमध्ये तिघेजण बीडमधील असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्युज ला दिली. आता पोलिस भरतीमध्ये देखील बीडच्या महाठगांनी प्रताप […]
म्हाडाच्या परीक्षेत गडबड करणारा विद्यार्थी अटकेत !
बीड- शासकीय सेवेसाठीची कोणतीही परीक्षा असली तरी त्यात बीड वासीयांनी काही कुटाने केले नाहीत अस अलीकडच्या काळात घडलेले नाही.टीईटी असो की आरोग्य भरती किंवा म्हाडा ची परीक्षा प्रत्येक ठिकाणी पेपरफुटी, मार्क वाढवणे असे प्रकार बीड वासीयांनी केले आहेत.आताही म्हाडाच्या परीक्षेत आपल्या नावावर डमी परीक्षार्थी बसवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे बिडकरांची मान शरमेने खाली […]
जिल्ह्याला मिळाले 13 पशुधन अधिकारी !
बीड – राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाने महाराष्ट्र पशु संवर्धन सेवा गट – अ अंतर्गत सरळ सेवेने नियुक्त केलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती यादी निर्गमित केली असून, यांतर्गत बीड जिल्ह्यातील 13 पशु वैद्यकीय दवाखान्यांना आता पूर्णवेळ पशु धन विकास अधिकारी मिळाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत. […]
तब्बल आठ हजार अपात्र विद्यार्थ्यांना केले पात्र !
पुणे – टीईटी गैरव्यवहार प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर नवी मगिती उजेडात आली आहे. 2018 – 19 मध्ये तब्बल आठ हजार अपात्र विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे.यामध्ये अटक केलेले शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त […]
एमपीएससी ने कोणती परीक्षा पुढे ढकलली !
मुंबई – एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे.त्यामुळे या प्रकरणात विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे.५ आणि १२ फेब्रुवारीला ही परीक्षा होणार होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानं परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती आयोगाकडून दिली गेली आहे. एमपीएससी आयोगाने ट्विट करत परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत […]
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू होणार !
मुंबई – राज्यात सोमवार दि. 24 जानेवारी पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य […]
उपजिल्हाधिकारी आघाव पाटील निलंबित !
बीड- देवस्थान असो की कब्रस्थान अथवा मस्जिद कोणतीही जमीन कोट्यवधी रुपये घेवुन भु माफियांच्या घशात घालण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांना शासनाने निलंबित केले आहे.शुक्रवारी हे आदेश आल्याने पाटलांवर संक्रात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. बीड,गेवराई,आष्टी,पाटोदा,केज,अंबाजोगाई, शिरूर अशा कोणत्याही तालुक्यातील इनामी जमीन अथवा देवस्थान किंवा मस्जिद ची जमीन गेल्या तीन चारवर्षात खालसा […]
टीईटी घोटाळ्यात सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मार्क बदलले!
पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणातील धक्कादायक खुलासे पोलीस तपासात होऊ लागले आहेत.तब्बल सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचे मार्क बदलून त्यांना पास करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये शिक्षण विभागातील सावरीकर याने जीए सॉफ्टवेअर ला दिल्याचे समोर आले आहे.या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून शिक्षण विभागाने आता 2013 पासून च्या टीईटी पास विद्यार्थ्यांच्या प्रमानपत्रांची तपासणी सुरू केल्याने अनेकांचे धाबे […]
पेपर फोडणारे मास्तर निलंबित !
बीड – आरोग्य भरती आणि टीईटी पेपर फोडण्यात थेट सहभाग निष्पन्न झाल्यानंतर आणि गुन्हे दाखल होवुन पोलिसांकडून अटकेची कारवाई झालेल्या नागरगोजे नामक दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. प्रल्हाद नागरगोजे ( जी प प्राथमिक शाळा कुककडगाव)आणि विजय नागरगोजे (सहशिक्षक,काकडहिरा) अशी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत . राज्यात उघडकीस आलेल्या आरोग्य भरती घोटाळ्यात मंत्र्यलयीन अधिकाऱ्यांपासून […]