February 7, 2023

Category: अर्थ

पूर्णवादितून बाहेगव्हाणकर, देशपांडे आउट तर जोशी,वैद्य,पालवनकर यांची एन्ट्री !
अर्थ, माझे शहर

पूर्णवादितून बाहेगव्हाणकर, देशपांडे आउट तर जोशी,वैद्य,पालवनकर यांची एन्ट्री !

बीड- मराठवाड्यासह पुणे ,नाशिक पर्यंत शाखांचा विस्तार असलेल्या पूर्णवादी सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान तीन जेष्ठ संचालकांना डावलण्यात आले आहे तर पहिल्यांदाच पारनेरकर महाराजांच्या चिरंजीवाचा पॅनल मध्ये समावेश झाला आहे.जेष्ठ संचालक बाळासाहेब बाहेगव्हाणकर, डॉ किरण देशपांडे यांना डावलण्यात आले आहे तर डॉ सुभाष जोशी,डॉ विवेक पालवनकर, डॉ आनंद वैद्य यांची बँकेत एन्ट्री झाली आहे.हा बदल अनेकांना […]

पुढे वाचा
चूक कंपनीची त्रास शेतकऱ्यांना !
अर्थ, माझे शहर

चूक कंपनीची त्रास शेतकऱ्यांना !

बीड-शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल साडेबारा कोटी रुपये जमा झाल्यानंतर कंपनीने एकूण बारा हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती गोठवली आहेत,त्यामुळे या शेतकऱ्यांना ऐन कामाच्या वेळेला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. बजाज अलियान्झ कंपनीने चुकून अतिरिक्त १२ कोटी ३५ लाख १३ हजार ३५८ रुपयांची रक्कम १२ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केल्याचा दावा केला आहे. पैसे […]

पुढे वाचा
राज्यातील साखर उद्योगाला अर्थमंत्र्यांचे बूस्टर !
अर्थ, टॅाप न्युज

राज्यातील साखर उद्योगाला अर्थमंत्र्यांचे बूस्टर !

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगाला मोठी मदत केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.कारखान्यांना प्राप्तिकरात सूट देण्यात आली आहे,यामुळे दहा हजार कोटी रुपयांची अप्रत्यक्ष मदत होणार आहे.सहकारी साखर कारखान्यांसाठी ही महत्वाची घोषणा असून कारखान्यांचा गेल्या १० वर्षांपासूनचा हा […]

पुढे वाचा
रेल्वे,विमानांचे जाळे उभारण्यावर भर – सीतारामन !
अर्थ, टॅाप न्युज, देश

रेल्वे,विमानांचे जाळे उभारण्यावर भर – सीतारामन !

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.भारतीय रेल्वेसाठी तब्बल 2.4 लाख कोटींचा निधी ते देशात 50 नवीन विमानतळे उभारणार असल्याची घोषणा यावेळी सीतारामन यांनी केली. रेल्वे अर्थसंकल्प आता केंद्रीय संकल्पातच मांडला जातो. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. […]

पुढे वाचा
पिककर्जासाठी आता सीबील ची गरज नाही !
अर्थ, टॅाप न्युज

पिककर्जासाठी आता सीबील ची गरज नाही !

बीड- पीककर्ज असो किंवा इतर कोणतेही कर्ज यासाठी तुमचा सीबील स्कोर चांगला असावा लागतो,या सीबील स्कोर मुळे अनेकदा शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येतात.मात्र आता सीबील स्कोर ची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सीबील च्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची सुटका होणार हे नक्की. “पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांनी ‘सिबिल’ अथवा ‘सिबिल स्कोअर’चे बंधन घालू नये. रिझर्व्ह […]

पुढे वाचा
मंत्री बँकेची निवडणूक बिनविरोध !
अर्थ, माझे शहर

मंत्री बँकेची निवडणूक बिनविरोध !

बीड- सहकार आणि शिक्षण क्षेत्रात वर्चस्व असणाऱ्या सुभाष सारडा यांनी आपल्या पुढच्या पिढीकडे नेतृत्व सोपवले आहे.35 वर्षांपासून सुभाष सारडा यांचे एकहाती वर्चस्व असणाऱ्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर आदित्य,आदिती यांच्यासारख्या तरुणांना संधी दिली आहे.बँकेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली.बहुतांश संचालक हे चाळीशीच्या आतील आहेत हे विशेष. गुरूवार ५ जानेवारी २०२३ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी […]

पुढे वाचा
नोटबंदी योग्यच ! सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब !!
अर्थ, टॅाप न्युज, देश

नोटबंदी योग्यच ! सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब !!

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये अचानक जाहीर केलेली नोटबंदी सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवली आहे.त्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.4 विरुद्ध 1 या बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय योग्य ठरवला आहे.केंद्राच्या निर्णयाविरोधात तब्बल 58 याचिका दाखल झाल्या होत्या हे विशेष. केंद्र सरकारने २०१६ मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुप्रीम […]

पुढे वाचा
आयसीआयसीआय कर्ज घोटाळा ! वेणूगोपाल धुत यांना अटक !!
अर्थ, टॅाप न्युज

आयसीआयसीआय कर्ज घोटाळा ! वेणूगोपाल धुत यांना अटक !!

मुंबई – चंदा कोचर आणि दिपक कोचर  पाठोपाठ सीबीआयकडून आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील तिसरी अटक करण्यात आली आहे.व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत  यांना सीबीआयने अटक केली आहे. कोचर दामप्त्याला अटक झाल्यानंतर सीबीआयने ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. आर्थिक नियमितता आणि कर्ज प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप आहे. सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून ही अटक करण्यात आली. […]

पुढे वाचा
डिझिटल चलन म्हणजे नेमकं काय रे भाऊ !
अर्थ, टॅाप न्युज

डिझिटल चलन म्हणजे नेमकं काय रे भाऊ !

भारतीय रिझर्व्ह भारतीय बँकेने 01 डिसेंबर 2022 रोजी रिटेल डिजिटल रुपया चलनात आणला आहे . मात्र ही सामन्यासाठी अत्यंत नवी संकल्पना असल्या मुळे त्याची माहिती करून देण्याचा ह्या लेखाद्वारे प्रयत्न केला आहे.पूर्णवादी नागरी सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यांनी . डिझिटल चलन या साठी पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे . पहिला टप्पा […]

पुढे वाचा
अधिकारी अन कर्मचाऱ्यांच्या टक्केवारी साठी शिक्षक,पेन्शनरांची दिवाळी अंधारात !
अर्थ, माझे शहर, शिक्षण

अधिकारी अन कर्मचाऱ्यांच्या टक्केवारी साठी शिक्षक,पेन्शनरांची दिवाळी अंधारात !

बीड- पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि गोरे,प्रधान या कर्मचाऱ्यांच्या टक्केवारीच्या हव्यासापोटी बीड तालुक्यातील हजारो शिक्षक आणि पेन्शनर लोकांची दिवाळी अंधारात गेली आहे.पगार अन पेन्शन साठी आलेला निधी या लोकांनी टक्केवारी घेत गुत्तेदारांच्या घशात घातला अन त्याचा फटका पेन्शनर शिक्षकांना बसला.चार महिन्यापासून पगार रखडला असला तरी याच्याशी ना शिक्षणाधिकारी ना सीईओ या दोघांनाही […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click