बीड- पत्नीच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत खुनाचे सत्र सुरूच राहील अशी चिठ्ठी लिहून वृद्ध शेतकऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.आरोपीने खून केल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आश्रय घेतला होता,पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली. खांबा लिंबा गावच्या नारायण सोनवणे हे आपल्या घरासमोर झोपले असताना त्यांच्यावर देखील धारदार शस्त्राने वार करून त्यांना जिवे […]
अविनाश भोसले यास अटक !
मुंबई – राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे तथा बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआय ने अटक केली आहे.डी एच एफ एल प्रकरणात ही अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्जऱोख्यांतून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे […]
दुचाकीवरून पाठलाग करत हत्या !
बीड- रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पाठलाग करत एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची थरारक घटना बीड नजीक घडली.बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा थरार घडल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात घडणारे बलात्कार आणि खुनाचे सत्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बीड तालुक्यातील मंझरी येथील सिद्धेश्वर बहिरवाळ याच्या बहिणीशी गावातीलच ब्रम्हदेव कदम याच्याशी अनैतिक […]
नवऱ्याचे दोन तुकडे केले अन बायको फरार झाली !
माजलगाव – अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचे तीन प्रियकरांच्या मदतीने दोन तुकडे करून जिल्ह्याबाहेर नेऊन टाकणाऱ्या घटनेचा पोलिसांनी नऊ महिन्यांनी उलगडा केला आहे.नवऱ्याचा खून करणारी बायको मात्र अद्याप फरार असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथील दिगंबर गाडेकर हे सप्टेंबर2021 पासून घरातून गायब होते.संजय गांधी निराधार योजनेचे काम करणाऱ्या गाडेकर यांच्या […]
महसूल अन पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची झापड !
बीड- गेवराई,माजलगाव, परळी,आष्टी,शिरूर या तालुक्यातून अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी नदीपात्राचे वाटोळं केलं आहे.जेसीबी,पोकलेन,केन्या आणि बोटीने वाळू उपसा सुरू असताना महसूल आणि पोलीस प्रशासन मात्र कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहे.कारण वाळू ठेकेदार हे पुढारी आहेत अन त्यांनी प्रशासनाच्या तोंडात पैशाचा बोळा कोंबला आहे,त्यामुळे कारवाई होण्याची शक्यता नाहीये. बीड जिल्ह्यात सगळे अवैध […]
राजकीय पदाधिकारी असलेल्या सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या !!
बीड – कोणी उपजिल्हाप्रमुख तर कोणी नगरसेवक तर कोणाची आई नगरसेवक अशा राजकीय पदाधिकारी असलेल्या खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसच हे प्रकरण बाहेरच मिटावे यासाठी वाट पाहत असल्याचे चित्र आहे.राजकीय पदाधिकारी असणाऱ्या खाजगी सावकारांच्या पोलीस मुसक्या आवळणार का हाच खरा प्रश्न आहे. पंकज बबनराव काळे […]
पाच महिलांचा बुडून मृत्यू !
लातूर – कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच ऊसतोड कामगार महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात घडली.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिला या परभणी जिल्ह्यातील पालम येथील रहिवासी आहेत. राधाबाई आडे,काजल आडे आणि दीक्षा आडे या तीन मायलेकी आपल्या काही सहकारी महिलांसोबत कपडे धुण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा […]
बापलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू !
परळी – शहरातील बरकत नगर भागातील शेख सादिक हे दादाहरी वडगाव येथील विहिरीत बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी गेलेला मुलगा शेख रफिक याने प्रयत्न केले.या घटनेत दोघेही बापलेक बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेख सादिक हे त्यांच्या नातेवाईकांसोबत दादाहरी वडगाव येथे फिरण्यासाठी गेले होते.यावेळी विहिरीवरून पाणी काढत असताना पाय घसरून ते विहिरीत पडले.त्यांना वाचविण्यासाठी […]
डीवायएसपी लोढा यांचा वाळू माफियांना दणका !
गंगाखेड – एकीकडे बीड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पुढाऱ्यांच्या सहकार्याने वाळू माफियांनी हैदोस घातला असताना दुसरीकडे बीडचे सुपुत्र तथा गंगाखेड चे पोलोस उपाधीक्षक श्रेणीक लोढा यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत.तब्बल 98 वाळू माफियांवर गुन्हे दाखल करत लोढा यांनी 38 आरोपी ताब्यात घेतले आहेत.या कारवाईत पोलिसांनी साडेसात कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. परभणी जिल्ह्यात वाळू माफियांनी […]
डॉ सुदाम मुंडेला जामीन !
औरंगाबाद- राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणी आरोपी असलेल्या सुदाम मुंडेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुदाम मुंडेला 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर सुदाम मुंडेला औरंगाबाद खंडपीठाने जामीन देतेवेळी 5 वर्षासाठी वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. तदनंतरही बीडच्या जिल्हाधिकार्यांकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बोगस डॉक्टर शोध कमिटीने […]