मुंबई – विधानपरिषद च्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे विक्रम काळे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सुधाकर आडबाले यांनी विजय मिळवला राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक मधून सत्यजित तांबे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.अमरावती मध्ये माजीमंत्री रणजित पाटील पिछाडीवर आहेत.झ मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते.पहिल्या पसंतीच्या मतामधून कोटा पूर्ण […]
कोकणात भाजपचा विजय !
कोकण – राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल आहे.यामध्ये कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.या ठिकाणी भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. अमरावती आणि नाशिक पदवीधर आणि नागपूर, कोकण आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत पहिला निकाल हाती आला असून कोकणात महाविकास […]
रेल्वे,विमानांचे जाळे उभारण्यावर भर – सीतारामन !
नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.भारतीय रेल्वेसाठी तब्बल 2.4 लाख कोटींचा निधी ते देशात 50 नवीन विमानतळे उभारणार असल्याची घोषणा यावेळी सीतारामन यांनी केली. रेल्वे अर्थसंकल्प आता केंद्रीय संकल्पातच मांडला जातो. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. […]
ऊसतोडणी च्या अडचणी दूर होणार !
बीड- ऊसतोडणी करण्यासाठी कामगार आणि मुकादम यांच्याकडून दारू,मटण यासह विविध मागण्या करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास आता बंद होणार आहे.साखर आयुक्तालयाने याबाबत एक अभ्यास गट स्थापन केला असून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबणार आहे. ऊसतोडणी व वाहतुकीसंदर्भात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तेरा सदस्यांच्या अभ्यासगटाची नियुक्ती केली आहे. ऊस […]
मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट ! 28 ठार !!
पाकिस्तान – पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट झालाय. येथील पोलीस वसाहतीमधील मशिदीमध्ये भाविक नमाज पठण करत होते, त्यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त आहे.यामध्ये 28 जणांचा मृत्यू झालाय तर 150 जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बॉम्बस्फोटात 28 जणांचा मृत्यू झाला आहे तर 150 जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर […]
एप्रिल अखेर धुराडी बंद होणार !
पुणे- गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर म्हणजेच एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यात तब्बल 200 कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने आतापर्यंत 70 लाख टनांचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी जून अखेरपर्यंत ऊस गाळप हंगाम सुरू होता.अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने कारखाने उशिरापर्यंत सुरू होते.मात्र यंदा कारखान्यांकडून उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप […]
मला तुरुंगात टाकण्याचा डाव – फडणवीस !
मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी अनेक प्लॅन केले गेले,संजय पांडे यांना ते टार्गेट देण्यात आले होते असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनीच आपल्यासाठी मातोश्री चे दरवाजे बंद केले असंही फडणवीस म्हणाले. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना फडणवीस यांनी अनेक मुद्यावर स्पष्टपणे आपली भूमिका […]
बोराडे,पानसंबळ, भोरे,लवांड यांनी केला व्हाउचर घोटाळा !
बीड- सार्वजनिक बांधकाम विभागात वाउचर पेमेंट नावाचा एक कुरण कार्यकारी अभियंता आणि कर्मचाऱ्यांसाठी हक्काचा बनला आहे याची अनेक उदाहरणे बांधकाम विभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये पहावयास मिळतील तत्कालीन कार्यकारी अभियंता चव्हाण असो की मी विद्यमान अभियंता तोंडे प्रत्येक जण आपले वरचे खर्च भागवण्यासाठी या वाउचर पेमेंटचा वापर करतो आणि त्याचा फायदा पान संबळ बोराडे […]
भगतसिंग कोशारी निवृत्ती घेणार !
मुंबई – नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली. “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि […]
बोगस प्रमाणपत्र देणारे 52 शिक्षक निलंबित !
बीड- जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करून लाभ घेणाऱ्या 52 शिक्षकांवर मोठी कारवाई केली आहे.या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या सर्वांकडून बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर जेवढे लाभ घेतले आहेत त्यांची वसुली केली जाणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने शिक्षक बदलीच्या वेळी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर बदलीसाठी अर्ज केले होते.मात्र 356 शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षकांनी […]