December 10, 2022

उद्या बीडमध्ये रोजगार मेळावा !एक हजारपेक्षा जास्त नोकरीच्या संधी !!

उद्या बीडमध्ये रोजगार मेळावा !एक हजारपेक्षा जास्त नोकरीच्या संधी !!

बीड- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बीड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बीड मार्फत दिनांक 03 नोव्हेंबर 2022 रोजी गुरुकुल इंग्लिश स्कुल, गुरुकुल नगर, शांताई हॉटेल मागे, काझी नगर जवळ, जालना रोड, बीड, ता. जि. बीड येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्था तसेच विविध उद्योग, कारखाने यामध्ये बेरोजगार युवकांसाठी तब्बल 1025 रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तरी या संधीचा लाभ तरुणांनी घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे.

गुरुकुल इंग्लिश स्कुल, बीड या कंपनी मध्ये
1) माध्यमिक शिक्षक (गणित) एकूण पदे–03 शैक्षणिक पात्रता- पदवी, बी.एड, बी.एस.सी. वयोमर्यादा -18 ते 58, 2) माध्यमिक शिक्षक (विज्ञान) एकूण पदे–03 शैक्षणिक पात्रता- बी.एस.सी. बी.एड वयोमर्यादा-18 ते 58, 3) कॉम्प्युटर (शिक्षक) एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता-बी.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स वयोमर्यादा-18 ते 58, 4) टेलि कॉलर एकूण पदे – 02 शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी वयोमर्यादा – 21 ते 45 जॉब लोकेशन बीड.

जे बी एन इंजिटेक प्रा. लि. या कंपनी मध्ये
1) क्वालिटी इंजिनिअर एकूण पदे–15 शैक्षणिक पात्रता- डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग वयोमर्यादा-18 ते 35 जॉब लोकेशन पुणे,
2) सी.एन.सी. ऑपरेटर एकूण पदे–25 शैक्षणिक पात्रता- दहावी, बारावी, आयटीआय (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिकल) वयोमर्यादा-18 ते 25 जॉब लोकेशन बीड,
3) व्ही.सी.एम. ऑपरेटर एकूण पदे–25 शैक्षणिक पात्रता- दहावी, बारावी, आयटीआय (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिकल) वयोमर्यादा-18 ते 35 जॉब लोकेशन पुणे.

दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद या कंपनी मध्ये
1) हेल्पर एकूण पदे–60 शैक्षणिक पात्रता- दहावी, बारावी वयोमर्यादा-18 ते 35,
2) सेक्युरिटी गार्ड एकूण पदे–50 शैक्षणिक पात्रता- दहावी, बारावी वयोमर्यादा-22 ते 45 जॉब लोकेशन औरंगाबाद.

टॅलेनसेतु सर्व्हिस. प्रा. लि., ठाणे या कंपनी मध्ये
1) मेकॅनिक ऑपरेटर एकूण पदे–20 शैक्षणिक पात्रता- आय.टी.आय (फिटर,वेल्डर,मेकॅनिकल), डीप्लोमा (फिटर,वेल्डर,मेकॅनिकल), वयोमर्यादा-18 ते 30,
2) असेम्बली लाईन ऑपरेटर एकूण पदे–20 शैक्षणिक पात्रता- पदवी, बी.एस.सी. वयोमर्यादा-18 ते 30 जॉब लोकेशन पुणे/ठाणे.

क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. बीड या कंपनी मध्ये केंद्र मॅनेजर एकूण पदे–150 शैक्षणिक पात्रता- बारावी वयोमर्यादा-18 ते 29 जॉब लोकेशन औरंगाबाद /बीड.

वायरलेस जॉब्स कंसल्टन्सी या कंपनी मध्ये
1) रिलेशनशिप मॅनेजर, कॅशियर (ICICI) बँक एकूण पदे–220 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 55,
2) बीझीनेस डेव्हलपमेंट एक्झीक्युटीव (HDFC) बँक एकूण पदे–200 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 55,
3) असोसिएट मॅनेजर (HDFC LIFE) एकूण पदे–10 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 50,
4) ब्रँच रिलेशनशिप मॅनेजर एस बी आय (SBI) एकूण पदे–100 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 55,
5) असिस्टंट मॅनेजर (Axis Bank) एकूण पदे–50 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 50 जॉब लोकेशन संपुर्ण महाराष्ट्रात.

हर्षवर्धन सेवाभावी संस्था, बीड या कंपनी मध्ये सिक्युरिटी गार्ड एकूण पदे–10 शैक्षणिक पात्रता- दहावी वयोमर्यादा-18 ते 35 जॉब लोकेशन बीड.

द कुटे ग्रुप, बीड या कंपनी मध्ये
1) बॉयलर अंटेंडट एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण व बॉयलर ॲटेंडंट वयोमर्यादा-18 ते 35,
2) रिफायनरी ऑपरेटर एकूण पदे–03 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी वयोमर्यादा-18 ते 35,
3) प्लांट ऑपरेटर एकूण पदे–03 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी व ॲसिड प्लांट ऑपरेटर वयोमर्यादा-18 ते 35,
4) केमिस्ट एकूण पदे–04 शैक्षणिक पात्रता- बी.एस.सी/एम.एस.सी केमिस्ट्री वयोमर्यादा-18 ते 35,
5) इलेक्ट्रीशिअन एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- दहावी/ बारावी, आयटीआय इलेक्ट्रिकल, डीप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग वयोमर्यादा-18 ते 35,
6) सेल्स कॉरडीनेटर एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- कॉमर्स मधील पदवी वयोमर्यादा-18 ते 35,
7) ड्रायर ऑपरेटर एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- दहावी व बॉयलर ॲटेंडंट वयोमर्यादा-18 ते 35,
8) एक्सपेलर मशिन ऑपरेटर एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी वयोमर्यादा-18 ते 35,
9) वेट ब्रीज ऑपरेटर एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- बी.कॉम. वयोमर्यादा-18 ते 35,
10) कर्मशिअल ऑपरेटर एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- बी.कॉम. वयोमर्यादा-18 ते 35,
11) अकांउटंट एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- कॉमर्स मधील पदवी वयोमर्यादा-18 ते 35 जॉब लोकेशन बीड.

ऑरिक ग्रीन, औरंगाबाद या कंपनी मध्ये
1) हेड प्लांट एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- बी.ई./बी.टेक. मेकॅनिकल मेकॅनिकल वयोमर्यादा-18 ते 40,
2) प्रोजेक्ट मॅनेजर एकूण पदे–04 शैक्षणिक पात्रता- बी.ई./बी.टेक. मेकॅनिकल, बी.ई. /बी.टेक. सिव्हिल वयोमर्यादा-18 ते 40,
3) स्टोअर मॅनेजर एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- कोणतीही पदवी वयोमर्यादा-18 ते 40,
4) स्टोअर असिस्टंट एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- कोणतीही पदवी वयोमर्यादा-18 ते 40,
5) मशिन मेंटेनन्स एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी व मेकॅनीक मशीन टुल मेंटेनन्स, बी.ई./बी.टेक., आयटीआय वयोमर्यादा-18 ते 40,
6) सी.एन.सी. ऑपरेटर एकूण पदे–04 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी व आय.टी.आय (सी.एन.सी) वयोमर्यादा-18 ते 40 जॉब लोकेशन औरंगाबाद.

मेगा फिड प्रा. लि. या कंपनी मध्ये फिल्ड ऑफिसर एकूण पदे–23 शैक्षणिक पात्रता- बी.एस.सी. ॲग्री, डीप्लोमा ॲग्री वयोमर्यादा-18 ते 40 जॉब लोकेशन परभणी व हिंगोली. सदरील पदसंख्या कमी अथवा जास्त असा बदल होऊ शकतो.

रोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभागी व्हावे
सर्वप्रथम नोकरी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोकरी साधक (Job seeker) म्हणून नोंदणी करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन Login बटनावर क्लिक करावे. प्रोफाईल मधील पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या लिंक वर क्लिक करुन रोजगार मेळाव्याचा बीड जिल्हा निवडून Filter बटनावर क्लिक करावे. आपल्याला “बीड – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 3” दिसु लागेल. त्यातील action या पर्यायाखालील दोन बटनापैकी पहिल्या बटनावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल तर दुसऱ्या बटनावर क्लिक केल्यास मेळाव्यातील रिक्त पदे दिसतील. दुसऱ्या बटनावर क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. सदर संदेश काळजीपुर्वक वाचा व I agree बटनावर क्लिक करावे. आपल्याला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कौशल्य व अनुभव यानुसार पदाची निवड करावी लागेल व apply बटनावर क्लिक करावे. आपल्याला एक संदेश दिसेल सदर संदेश काळजीपुर्वक वाचा व OK बटनावर क्लिक करावे. आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदवला जाईल.
याबाबत बीड जिल्हयातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करावे व त्याचबरोबर दिनांक 03 नोव्हेंबर 2022 रोजी गुरुकुल इंग्लिश स्कुल, गुरुकुल नगर, शांताई हॉटेल मागे, काझी नगर जवळ, जालना रोड, बीड, ता. जि. बीड येथे प्रत्यक्ष येऊन संधीचा लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्यास येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. याबाबत काही अडचणी असल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02442-299116 आणि श्री. इंगोले यांना 9822781876 या क्रमांकावर, श्री. शाह यांना 7020991467 या क्रमांकावर व श्री. यादव यांना 8208369890 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच Beed Skill या फेसबुक पेजला फॉलो व लाईक करावे असे आवाहन श्री. सुशिल उचले, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांनी केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click