News & View

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना आता जागेवर काटा पेमेंट ! बीड बाजार समितीमध्ये आ क्षीरसागर यांचा निर्णय !!

बीड -बाजार समितीची सत्ता हातात आल्यानंतर आ संदिप क्षीरसागर यांनी प्रथमच बीट च्या वेळी हजेरी लावून शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पुढे बीड बाजार समितीमध्ये दिवसातून दोनवेळा बीट होईल आणि शेतकऱ्यांना काटा पेमेंट मिळेल अशी माहिती आ क्षीरसागर यांनी दिली.

शेतकरी परिवर्तन आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तनाची सुरुवात केली असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बाजार भाव (बीट) काढून शेतकर्‍यांच्या हातात रक्कम दिली. यापुढे शेतकर्‍यांनी विकलेल्या मालाची त्या दिवशी रक्कम मिळणार तर शेतकर्‍यांच्या मालाला दिवसातून दोनदा बाजार भाव मिळणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. 

गेल्या 40 वर्षापासून प्रस्थापितांनी शेतकर्‍यांना वेठीस धरत पिळवणुक करण्याचे काम केले होते. शेती मालाला बे भाव देऊन सुद्धा बळीराजाला पैशासाठी दिवसभर कृषी उत्पन्न बाजार समिती थांबवावे लागायचे ही बाब लक्षात येताच आ.संदीप क्षीरसागर यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उपस्थित राहून शेतकर्‍यांच्या शेती मालाचा बाजार भाव केला आणि लगेच बळीराजाच्या हातात शेती मालाची रक्कम सुपूर्द केली. आता यापुढे अशाच पद्धतीने शेतकर्‍यांचा आणि शेतीमालाचा सन्मान केला जाणार असून बळीराजाला पैशाकरता बाजार समितीमध्ये थांबण्याची गरज नाही. तर शेतकर्‍यांच्या मालाला दिवसातून दोनदा बाजार भाव मिळणार असल्याची माहिती आ.संदीप क्षीरसागर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उपस्थित शेतकर्‍यांना दिली. 

शेतकर्‍यांच्या मालाचा पुकार बीड बाजार समितीत यापूर्वी दुपारी होत होता. यामुळे शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसायचा. आजपासून काही सुधारणा करण्यात आली असून यामध्ये तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार पहिला पुकार दररोज सकाळी 9 वाजता घेण्यात येणार असून दुसरा पुकार दुपारी करण्यात येणार आहे. याआधी हा पुकार एकाचवेळी होत होता व तो दुपारी असायचा, पुकार झाला की तात्काळ माप घेण्यात येणार आहे. यापूर्वी पुकार झाल्यानंतर माप घेतले जात नव्हते तो बदल आता करण्यात आलेला आहे. माप झाले की तात्काळ शेतकर्‍यांना त्यांच्या मालाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी मालाचे माप झाले की सबंधित आडत चालकाकडून आपल्या मालाची रक्कम घ्यावी असे आवाहन आ.संदीप क्षीरसागरांसह संचालक मंडळाने केले आहे.

यावेळी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्यासह सभापती सरलाताई मुळे, उपसभापती शामसुंदर पडुळे, राष्ट्रवादीचे नेते डॉ.बाबू जोगदंड, संचालक पी.वाय. जोगदंड सर, संचालक धनंजय गुंदेकर, संचालक पंडित माने, संचालक शरद झोडगे, सचिव हारून पठाण,  झांबरे पाटील, केशव गायकवाड, कुकडे आदींसह व्यापारी, आडत, खरेदीदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *