News & View

ताज्या घडामोडी

मिलियाच्या विरोधात पालक संतापले ! गुन्हेगारांना हकालण्याची मागणी !!

बीड- शहरातील मिलिया शाळेत आमेर काझी या शिक्षकाने केलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात पालक चांगलेच संतप्त झाले आहेत. आपल्या पाल्यांचे भविष्य उध्वस्त करणाऱ्या दोषी शिक्षक,शिक्षकांना हाकलून द्या अस म्हणत पालकांनी एकच गोंधळ घातला. संस्थाचालक यांच्या एका चुकीच्या शब्दांमुळे संतापलेल्या पालकांनी संस्था चालकांचा निषेध केला.

बीड शहरातील अंजुमन इशात ये तालीम या संस्थेच्या मिलिया गर्ल्स स्कूलमध्ये शिकवणाऱ्या आमेर काझी नावाच्या एका शिक्षकाने शाळेतीलच महिला शिक्षिका तसेच शहरातील इतर महिलांसोबत सेक्स रॅकेट चालवण्याचे प्रकरण उघडकिस आले.

गेल्या आठ ते दहा वर्षापासून आमेर काझी हा मिलिया गर्ल्स हायस्कूल आणि स्कूल मधील काही शिक्षकांसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ तयार करायचा त्यासोबतच शहरातील इतर महिलांसोबत चे व्हिडिओ देखील त्यांनी रेकॉर्ड करून ठेवले होते याबाबत त्याच्या पत्नीला माहिती मिळाल्यानंतर तिने संस्थाचालक यांच्याकडे अमीर वर कारवाई करण्याची मागणी केली मात्र संस्थाचालकांनी त्याला पाठीशी घातले हे प्रकरण न्यूज अँड व्ह्यूच्या माध्यमातून उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली संस्थेने आमिर काझी याच्यावर कारवाई केल्याचे सांगितले

मात्र त्याच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इतर शिक्षिका आजही शाळेत कार्यरत आहेत त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या तरी बहुतांश पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही संस्थाचालकांनी शिक्षकांना प्रत्येक पालकाच्या घरी पाठवून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येण्याचे आदेश दिले तसेच पालक सभेचे आयोजन केले यावेळी पालकांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर संस्था चालकांनी उत्तर देण्याऐवजी उडवा उडवी केली तसेच मिलीया आमच्यासाठी हरम आहे असे म्हटले त्यामुळे मुस्लिम समाजातील पवित्र जागेला तुम्ही शाळेचा दर्जा कस काय देता या शाळेत अशा गोष्टी घडल्यात ती पवित्र कस काय असू शकते असं म्हणत संतापलेल्या पालकांनी अंगावर धावून जात संस्थाचालकांना तेथून पळून जाण्यास भाग पाडले

विशेष बाब म्हणजे या पालक सभेसाठी संस्था चालकांनी पोलीस संरक्षण मागवून घेतले होते जर पालक सभा होती तर त्या ठिकाणी पोलीस संरक्षण घेण्याची काय गरज होती संस्था जर का दोषी नसेल असं त्यांचं मत असेल तर मग पोलिसांना का बोलवण्यात आलं अद्यापही दोषी महिला शिक्षिका यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही आमिर काझीसह इतर दोषींवर गुन्हे का दाखल केले नाहीत या प्रश्नांची उत्तर न मिळाल्याने पालकांनी संताप व्यक्त करत संस्थेला कुलूप ठोकण्याची मागणी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *