News & View

ताज्या घडामोडी

कारखाना बंद पाडला, सूतगिरणी जाळली अन आता बाजार समितीचे वाटोळे करणाऱ्यांना दूर करा – संदिप क्षीरसागर !!

बीड- चाळीस वर्षांपासून सत्तेत असतानाही सूतगिरणी बंद पाडली, खांडसरी उद्योग बंद केला,गजानन कारखाना दहा पंधरा वर्षे बंद ठेवला ते आता बाजार समिती बचाव चा नारा देत आहेत.गेल्या चाळीस वर्षात यांनी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक केली या लोकांना आता त्यांची जागा दाखवा,कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा असे आवाहन बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेवटच्या टप्प्यात शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली असून विरोधकांचे भुलथापास मतदार बळी पडणार नसून शेतकर्‍यांच्या पोराला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुर्चीवर विराजमान करण्यासाठी मतदार बंधु भगिनी उद्याच्या मतदानाची वाट पाहत असून 40 वर्षाची सत्ता जात आहे. या मतदानाचे ते साक्षीदार होणार आहेत. परिवर्तन अटळ आहे हे प्रस्थापित ओळखून चुकले असून मतदारांना आमिष दाखवून आणि दबाव आणुन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुजान मतदार बांधव त्यांचा हा डाव हाणून पाडणार असून परिवर्तन अटळच आहे हे येत्या 29 तारखेला सिद्ध होणार आहे असे आवाहन शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या वतीने आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम,अनिलदादा जगताप,राजेंद्र मस्के,कुंडलिक खांडे,रवींद्र दळवी,प्रभाकर कोलंगडे,नारायण काशिद,कल्याण आखाडे,बाळासाहेब घुमरे,सुुशिलाताई मोराळे यांनी आवाहन केले आहे.

येणार्‍या पाच वर्षाच्या काळात बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नवाजले जाईल असे काम आम्ही करणार असून ही संधी डावलू नका, प्रस्थापितांना ज्या प्रमाणे बीड मतदार संघातून हद्दपार केले तीच वेळ आता आली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नंतर बीड नगर परिषदेमधून प्रस्थापितांना नामशेष करण्यासाठी येत्या 28 तारखेला शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना कपबशी समोर ठसा मारून प्रचंड मतानी विजयी करून परिवर्तन घडवावे असे शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ब्ल्यु प्रिंट तयार असून सत्तेवर येताच आम्ही पुढील प्रमाणे विकास कामे करणार आहोत. हमाल व मापाडी बांधवांकरता हक्काचे घरकुल व त्यांचा विमा,व्यापारी बांधवांकरिता वीज,पाणी,रस्ते आणि संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था,शेतकरी बांधव यांकरिता राहण्यासाठी व शेतीमाल ठेवण्यासाठी शेतकरी भवन बांधण्याचा मानस,कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व रस्ते,सौर पथदिवे,शौचालय,पिण्याचे पाणी व इतर व्यवस्था करणार अशा प्रकारची बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योजना आखली असून

गेल्या चाळीस वर्षापासून प्रस्थापितांनी शेतकर्‍यांचे अनेकस्तरावर बेहाल केले असून त्यांचा विकास पुढील प्रमाणे आहे, चाळीस वर्षापासून गजानन सहकारी साखर कारखाना बंद ठेवला, गजानन सुतगिरणी जाळुन टाकली, खडीसाखर कारखाना बंद पडला तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांच्या मालाला कवडीमोल भाव दिला, हक्काच्या व्यापार्‍यांना डावलून जिल्ह्याबाहेरील व घरातील व्यापार्‍यांचा मतदारामध्ये समावेश केला. हमाल व मापाडी बांधवांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवले, त्यांचा आरोग्य विमा आत्तापर्यंत काढला नाही, व्यापारी बांधवांना जीव धोक्यात टाकून रात्री बे रात्री रहदारी करावी लागते, अनेक वेळा व्यापारी बांधवांवर जीव घेणे हल्ले व लुटमारीचे प्रकार घडले आहेत. त्यांच्या संरक्षणाचे कुठलेही ठोस पाऊले घेतले नाही. बाहेर गावावरून आलेल्या शेतकर्‍यांसाठी राहण्याची, जेवणाची, शौचालयाची, पाण्याची, वीजेची व्यवस्था नाही, हा चाळीस वर्षापासून केलेला प्रस्थापितांचा विकास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *